Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा - माजी आमदार दत्तात्रय सावंत
मित्राला शेअर करा

पुणे – राज्य शासनाकडून २ जून २०२५ ते १२ जून २०२५ या कालावधीत घेतलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी3 झालेल्या शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या प्रशिक्षणामुळे उन्हाळी सुटीचा लाभ न मिळालेल्या शिक्षकांच्या १० दिवसांची अर्जित रजा (Earned Leave) त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली असून, शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयाने याबाबत दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सोलापूर, पुणे व अहिल्यानगर येथील शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.

काय आहे नियमावलीतील तरतूद ?

खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली १९८१ मधील नियम १६ (१८) अ नुसारः जर एखाद्या स्थायी कर्मच्याला मोठ्या सुट्ट्यांचा हक्क असूनही त्या सुटीचा लाभ घेता आला नाही अशा सुट्ट्यांच्या प्रमाणात त्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर अर्जित राजा जमा केली जाईल.

या तरतुदीच्या आधारे, उन्हाळी सुटीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना न्याय देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या मागणीला यश

या संदर्भात शिक्षक संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची दखल घेत माजी आमदार सावंत यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, शिक्षकांच्या खात्यात १० दिवसांची अर्जित रजा जमा केली जाणार आहे.

शिक्षक वर्गातून समाधान

या निर्णयामुळे प्रशिक्षण काळात सुट्टी गमावलेल्या शिक्षकांना न्याय मिळाला असून, शिक्षक वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा निर्णय इतर शैक्षणिक बाबींमध्येही समान न्यायाचे धोरण ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.