बार्शी- आयुष्यातआपण केलेल्या उत्तम कामाची पावती निवृत्तीनंतर समाधानाने मिळते असे विचार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी शाह कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ उज्ज्वला व्हनाळे यांच्या निवृत्ती समारंभात व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गूळपोळी व सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑ. क्रेडिट सोसायटी संचालक प्रमोद देशमुख, मारुती गायकवाड, बनसोडे साहेब न. पा. शि. मं. सुपरवायझर संजय पाटील सर, सतीश सातपुते, हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आयुब शेख यांनी केले
यावेळी सत्काराला उत्तर देताना व्हनाळे मॅडम यांनी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले व शिक्षक जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा दिला
या वेळी विद्यार्थीनीनी मनोगते व्यक्त केली तसेच सौ अग्रवाल सौ वीर सौ कुलकर्णी सौ हातोळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास वाय पी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अतुलभाई कोठारी, सचिव नागनाथ देवकते, संचालक शशिकांत गोडगे, दत्तात्रय व्हनाळे, वैभव व्हनाळे, हे उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थीनी, शिक्षक यांनी सेवानिवृत्ती बद्दल मॅडम ना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. गुंड मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या वेळी बाबा शिंदे, अडसूळ सर, राहुल वाणी, कोल्हे सर श्रीधर कांबळे सर सुपे सर रवी पोरे सर लक्ष्मी तोरड मॅडम, पाटणे, काळे मॅडम डोके, मॅडम, खोगरे मॅडम, स्वामी मॅडम, बुटे मॅडम क्षीरसागर सर, संगोळे सर, प्रमोद शिंदे, अमित मिरगणे, वाघमारे मॅडम दराडे सर काकडे सर, गोरे सर, सरवदे सर गलांडे सर, कांबळे सर, वालावडकर सर, नागनाथ सोनवणे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद