शिवाजी विद्यापीठाकडून खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू शिवाजी विद्यापीठाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खेळाडूंना अनेक सुविधा विद्यापीठाकडून देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येत आहे. सहा खेळाडूंना 50000 रूपयेही देण्यात येणार आहेत.
प्रभारी क्रीडा अधिकारी पी. टी. गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येत आहे. सहा खेळाडूंना प्रत्येकी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनही मिळेल.
खेळाडूंसाठी 300 खाटांचे स्पोर्ट्स हॉस्टेलही बांधले जाणार आहे. सध्या कोल्हापूर विद्यापीठ “मिशन ऑलिम्पिक” संकल्पनेवर काम करत आहे आणि या सुविधा खेळाडूंच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) प्रशिक्षक मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
क्रिडा व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवाजी विद्यापीठाप्रमाणे इतरही विद्यापीठांनी देखील अश्या क्रिडा शिष्यवृत्ती सुरू कराव्यात जेणेकरून अधिकाधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार