महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये यशवंत खांडवी येथील मुलींच्या संघाने घवघवीत यश प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये १९ वर्ष वयोगट मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरील खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री. संतोष खोगरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे संस्थापक-अध्यक्ष तसेच माजी उपाध्यक्षः जिल्हा परिषद, सोलापूर श्री. कौरवआप्पा माने , श्री यशवंत माने, मुख्याध्यापक श्री शिंदे एस. बी. सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व खांडवी ग्रामस्थ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न