भगवंत भक्त राजा अंबरीष सार्वजनीक अन्नछत्र मंडळ यांचे नुतन जागेत स्व. सौ. शोभाताई सोपल स्मृती सभागृह या ठिकाणी हभप जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल, बार्शी नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, भगवंत देवस्थान मंदिर सरपंच दादा बुडुख, उपसरपंच नाना सुरवसे प्रसन्नदाता मंडळाचे अध्यक्ष कमलेश हता, श्री भगवंत भ.रा. अंबरीष मंडळाचे अध्यक्ष अरुण ( बंडू ) माने, उपाध्यक्ष आबा भोसले, सचिव आबासाहेब कानगुडे, खजिनदार देबडवार दादा व सर्व ट्रस्टी व सर्व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण माने प्रस्ताविकेत म्हणाले सुरुवातीपासून ज्यांनी मदत केली व आजपर्यंत जे आम्हाला मदत करत आहेत त्या सर्वांचे आभार मानतो व भविष्यातही बार्शीकर मदत करतील, अशी आशा बाळगतो.
याप्रसंगी माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले की, ‘सगळ्या दानात श्रेष्ट असे अन्नदान’ जे हे मंडळ करत आहे. त्यासाठी बार्शीकर सदैव आपल्या पाठीशी आसतील. माझ्याकडून काही मदत पाहिजे असेल तर मी जरूर ती करेन. यानंतर ह.भ.प. बोधले महाराज यांनी श्रावण महिन्याचे महत्व सांगताना व भगवंत मंदिरात चालू असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पारायण चालू आहे. श्रावण महिनाही आहे व योगही चांगला आहे, गुरुपुष्यामृत आहे, असे म्हणाले.
यावेळी बा.न.पा. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे व मंडळाचे सचिव आबा कानगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्यावतीने उपाध्यक्ष अभिमान भोसले यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सभासदांनी व मित्रमंडळांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन