Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड

श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड

श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड
मित्राला शेअर करा

बार्शी:- के.आय.आय.टी.भुवनेश्वर (ओडिसा) येथे दिनांक 24 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर संघात निवड झाली आहे. सदर संघाचे सराव शिबीर डॉ. सुरेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथे चालू आहे.

या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, डॉ. दिलीप मोहिते, प्रबंधक प्रमोद जाधव, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

या खेळाडूस शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डाॅ. विजयानंद निंबाळकर, डॉ. रामहरी नागटिळक, प्रा.संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.