महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम तरतुदीनुसार कोणत्याही नवीन विद्याशाखा, पाठ्यक्रम किंवा ज्ञानशाखा किंवा विभाग सुरु करण्यासाठी, त्याचप्रमाणे, कोणत्याही अभ्यासक्रमासाठी जादा वैकल्पिक विषय सुरु करण्यासाठी विद्यापीठांना परवानगी देणे याबाबतचे अधिकार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेस प्रदान करण्यात आले आहेत.
तसेच, कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय दि.३०.०५.२०१८ अन्वये कृषि विद्यापीठांतर्गत पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी अभ्यासक्रमामध्ये जागांचे आरक्षण, सामाजिक आरक्षणाच्या वाटपाची कार्यपध्दती, प्रवेश कार्यपध्दती निश्चित करणेबाबत व खाजगी कृषि महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी, कृषि परिषदेच्या दि.२०.०६.२०२४ रोजी झालेल्या ११५ व्या बैठकीत, कृषि विद्यापीठाच्या विद्या परिषद व कार्यकारी परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर” या संस्थेस “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर” या नावाने बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्त्वावर नवीन कृषि महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यास अनुसरुन, “श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर” या संस्थेस बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्त्वावरील नवीन कृषि महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्याबाबतवी बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, अंतर्गत “श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर” या संस्थेला बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमता असलेले खाजगी कायमस्वरुपी विना अनुदानित तत्त्वावरील नवीन कृषि महाविद्यालय “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर” या नावाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यासही मान्यता देण्यात आली आहे
बार्शीत कृषि महाविद्यालय सुरु होत असल्याने बार्शी शहराच्या शैक्षणिक वैभवात भर पडणार आहे.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन