बार्शी : औरंगाबाद येथे ३ ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा होणार आहेत सदर संघाचे सराव शिबीर (मुली व मुले) २२ नोव्हेंबर पासून शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी या ठिकाणी प्रा. डॉ. सुरेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
या स्पर्धेसाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व्हॉलीबॉल संघात निवड झाली. मुलीच्या संघामध्ये- वैष्णवी बारंगुळे, अचल वरपे, सोनाली रामगुडे, सोनाली गोडगे तर मुलांच्या संघामध्ये क्षितिज लांडगे याची निवड झाली.
या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.शेख, प्रबंधक प्रमोद जाधव, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
निवड झालेल्या खेळाडूस डॉ. सुरेश लांडगे, डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर, डॉ. रामहरी नागटिळक, संजय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप