Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > सामाजिक कार्यकर्ते राहूल वाणी यांचा वाढदिवस, शालेय साहित्य वाटप व विवीध उपक्रमातुन साजरा

सामाजिक कार्यकर्ते राहूल वाणी यांचा वाढदिवस, शालेय साहित्य वाटप व विवीध उपक्रमातुन साजरा

मित्राला शेअर करा

दि:२२ – सामाजिक कार्यातुन आपली ओळख निर्माण करणारे ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांचा वाढदिवस दि २१ मे रोजी विवीध उपक्रमातुन साजरा करण्यात आला.

असा वाढदिवस केल्यामुळे समाजात देखील समाधान केले. राहुल वाणी यांनी या दिवशी बार्शीतील झाडावर प्रेम करणारी आणि झाडासाठी वेळ देणारी वृक्ष संवर्धन समिती बार्शी या समितीला फुल नाही पण फुलाची पाकळी म्हनुन या संस्थेला निधी दिला. आपला वाढदिवस हा वायफळ खर्च न करता या दिवशी आवाहन केले की वाढदिवसादिवशी हार, केक न आणता या दिवशी एक वही, पेन आणावी आणि या आवाहनाला प्रतिसाद देत तमाम बार्शीतील राहुल वाणी यांचे कार्य पाहुन, प्रेम करणारे सर्वानी तसेच मित्रपरिवाराने उस्फुर्त प्रतिसाद दिला. आणि या दिवशी तब्बल 30 डझन वह्या व 18 पेन बाॅक्स अस शालेय साहीत्य जमा झाले. या सर्व शालेय साहित्यांचे वाटप ते एका जवळच्या शाळेत देणार आहेत असे सांगीतले. यांचा वाढदिवस हा खुप संस्था, संघटना, वैयक्तीक भेटुन वह्या आणि पेन देत साजरा केला. असा वाढदिवस साजरा करावा असे श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेतील शिक्षक श्री गणेश कदम सर यांनी सांगीतले आणि त्यानुसार वाढदिवसाला खुप जणांनी प्रतिसाद दिला. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्था पदाधिकारी, सदस्य असतील. तसेच सामाजिक कार्य करणारे सुमित भैय्या खुरंगळे, विशाल वाणी, संतोष शेळगावकर मिञपरीवार, वृक्ष संवर्धन समिती बार्शी अशा अनेक सामाजिक कार्य करत लोकांनी वही पेन देत वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला प्रतिसाद दिला अशा सर्वाचे सर्वाचे राहुल वाणी यांनी आभार मानले.