Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची निवडणूक, 18 ऑगस्टला मतदान

सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची निवडणूक, 18 ऑगस्टला मतदान

सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची निवडणूक, 18 ऑगस्टला मतदान
मित्राला शेअर करा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी, मोहोळ, अनगर, सांगोला, मंगळवेढा, अकलूज, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी या नगरपालिकांची निवडणूक 18 ऑगस्ट रोजी होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे.

राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहेत.

लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.