Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न, पदाधिकारी निवडी जाहीर

सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न, पदाधिकारी निवडी जाहीर

सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न, पदाधिकारी निवडी जाहीर
मित्राला शेअर करा

बार्शी येथे शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री महेश पटवर्धन होते बैठकीला राज्य संघटनेचे माजी कोषाध्यक्ष श्री गोरख भिलारे, पंढरपूर हे उपस्थित होते बैठकीसाठी बार्शी, बार्शी तालुका, पंढरपूर, माढा, कुर्डूवाडी, सांगोला, सोलापूर शहरातील विक्रेते उपस्थित होते या बैठकीचे आयोजन बार्शी शहर व बार्शी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.

या बैठकीचे संचालन श्री गोरख भिलारे यांनी केले
या बैठकीत सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे नवीन कार्यकारणी निवडण्यात आली जिल्हाध्यक्षपदी श्री शिवलिंगप्पा मेडेगार यांचे एकमताने निवड करण्यात आली.

अध्यक्ष : श्री शिवलिंगप्पा मेडेगार, सोलापूर
उपाध्यक्ष : श्री नंदकुमार देशपांडे पंढरपूर
सचिव : श्री सचिन बाबर, बार्शी
कार्याध्यक्ष :श्री अरुण कोरे, कुर्डुवाडी
कोषाध्यक्ष : श्री उत्तम चौगुले, सांगोला
सदस्य श्री शाम थोरात, बार्शी
श्री सिद्धेश्वर सावंत, पंढरपूर
श्री अनिल खरात, सोलापूर
श्री रविराज शेटे, सांगोला यांची एकमताने निवड करण्यात आली आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांचे हार्दिक अभिनंदन
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघटना, सोलापूर या संघटनेसाठी सल्लागार म्हणून श्री महेश पटवर्धन पंढरपूर यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.