Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > सोलापूर जिल्ह्यात एक दिवसीय डाळिंब खोड किड नियंत्रण शिबीर संपन्न

सोलापूर जिल्ह्यात एक दिवसीय डाळिंब खोड किड नियंत्रण शिबीर संपन्न

मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्ह्यात डाळिंब लागवड सुमारे 4 लाख 73 हजार 77 हेक्टर क्षेत्रात असुन यामधे प्रामुख्याने सांगोला , पंढरपुर , माळशिरस मंगळवेढा , या भागात व डाळिंब उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात आहेत . सद्यस्थितीत सोलापुर जिल्ह्याचे डाळिंब हे मुख्य फळपिक आहे एकुण फळबाग क्षेत्राच्या 55 टक्के हिस्सा डाळिंब पिकाचा असताना उत्पादन खोड किड व तेल्यारोग यामुळे धोक्यात आलेले आहे .परिणामी शेतकरी या पिकाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत

त्याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील डाळींब पिकाच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे . ही बाब विचारात घेता , जिल्ह्यामध्ये सदर कीडीबाबत शेतकऱ्यांना जणजागृती व कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना याची माहिती व्हावी . याकरीता कृषि विभाग आत्मा , राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर , महात्मा फुले कृषि विद्यापीठ , राहूरी , कृषि विज्ञान केंद्र , शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी मित्र तसेच जिल्ह्यातील विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या सहभागाने सोलापुर जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र तसेच जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या सहभागाने संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र असलेल्या क्षेत्रात संपूर्ण उत्पादक गावपातळीवर दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी एका दिवसाचे अभियान राबविण्यात आले .

या अभियानात सहभागी होण्यासाठी सोलापुर जिल्ह्यातील सर्व जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले होते .

राबविण्यात आलेल्या या एका दिवसीय अभियानस जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.