सोलापूर उस्मानाबाद या 84 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार असुन रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्यास पुढील आठवड्यात प्रत्यक्षात सुरवात केली जाणार आहे. सोलापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार आहेत.या मार्गाच्या कामास दिवसेंदिवस गती मिळत आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे निर्माण उपमुख्य अभियंता यांनी भूसंपादन बाबत प्रस्ताव पाठविला असुन यात सरकारी,खासगी व सांजा उस्मानाबाद शिवारातील प्लॉट धारक जमीनीचा समावेश आहे.यात तुळजाभवानी मंदिर संस्थान,औद्योगिक विकास महामंडळ,सांजा गावातील जमिनी असलेल्या श्रीराम मंदिर देवस्थान तडवळे यांच्या मालकीच्या जमिनी आहेत.सांजा गावातील संपादित होणारी श्रीराम मंदिर देवस्थान जमीनपैकी काही जमीन ही खासगी लोकांच्या ताब्यात आहे मात्र सात बारा उतारा व इतर मालकी कागदपत्रे ही देवस्थानच्या नावाने आहेत तशीच बाब तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीबाबतही आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी लाइनमार्किंगचे काम सुरू करण्यात आले होते.या रेल्वे मार्गाच्या जमिनींमध्ये शासन आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचा समावेश आहे.
84 किलोमीटरच्या मार्गासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा अंतिम अहवाल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आला आहे.सोलापूर- उस्मानाबसोलापूर उस्मानाबाद या 84 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार असुन रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्यास पुढील आठवड्यात प्रत्यक्षात सुरवात केली जाणार आहे. सोलापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार आहेत.या मार्गाच्या कामास दिवसेंदिवस गती मिळत आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे निर्माण उपमुख्य अभियंता यांनी भूसंपादन बाबत प्रस्ताव पाठविला असुन यात सरकारी,खासगी व सांजा उस्मानाबाद शिवारातील प्लॉट धारक जमीनीचा समावेश आहे.यात तुळजाभवानी मंदिर संस्थान,औद्योगिक विकास महामंडळ,सांजा गावातील जमिनी असलेल्या श्रीराम मंदिर देवस्थान तडवळे यांच्या मालकीच्या जमिनी आहेत.सांजा गावातील संपादित होणारी श्रीराम मंदिर देवस्थान जमीनपैकी काही जमीन ही खासगी लोकांच्या ताब्यात आहे मात्र सात बारा उतारा व इतर मालकी कागदपत्रे ही देवस्थानच्या नावाने आहेत तशीच बाब तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीबाबतही आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी लाइनमार्किंगचे काम सुरू करण्यात आले होते.या रेल्वे मार्गाच्या जमिनींमध्ये शासन आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचा समावेश आहे.
84 किलोमीटरच्या मार्गासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा अंतिम अहवाल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आला आहे. सोलापूर – उस्मानाबाद मार्गामध्ये एकूण 33 गावांमधून हा मार्ग जाणार आहे.यात उस्मानाबादमधील 9 तुळजापूर येथील 15 तर सोलापूरमधील 9 गावांचा समावेश आहे.
सोलापूर – उस्मानाबद मार्गामुळे मराठवाडा,दक्षिण भारत, सोलापूरचा होणार फायदानवीन गाड्या सुरू होण्याची शक्यता असून दक्षिण भारतात जाण्यासाठी सुकर मार्ग होणार आहे.व्यापारी,शेतकरी,विद्यार्थी यांच्या प्रवासाची सोय होणार आहे.
सेंटर लाइनमार्किंगचे काम पूर्ण झाले असून या बाळे,केगाव, भोगाव, गुळवंची,कारंबा,बाणेगाव, मार्डी,सेवालालनगर, होनसळ,वडगाव,काटी, तामलवाडी,गंजेवाडी, सूरतगाव,सांगवी काटी, गोंधळवाडी,माळुंब्रा,कदमवाडी,सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगरुळपाटी, तुळजापूर, तडवळा,बोरी,बावी, वडगाव,पळसवाडी, देवळाली,शेखापूर,उस्मानाबाद सांजा,जहागीरदारवाडी या गावांचा समावेश असणार आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी जमिनी भूसंपादनाबाबत उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना अहवाल देण्यात आला होता. पुढील आठवड्यात जमीन संपादनाच्या कामास सुरुवात होणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला दिला जाईल असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले
very nice please provide the order issued by the compitant authority of solapur district. for this project with details of land acquired