कर्नाटक राज्यातुन गुन्हयातील सत्यानव लाख (९७,६५,०००) रूपये किमतीचा अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत एक आरोपी अटकेत. कुर्डुवाडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ११/०५/२०२२ रोजी व्हि. आर. एल या ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर मिळुन आला होता. व्हि. आर. एल कंपनीच्या प्रशासनास सदरची बाब समजल्यानंतर कंपनीचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता. नमुद व्हि आर एल कंपनीचा कंटेनर हा सागर, कर्नाटक राज्य येथुन नोयडा उत्तर प्रदेश येथे १ कोटी ३३ लाख रूपये किमतीच्या २७.५ टन वजनाच्या सुपारीच्या गोण्या घेवून निघाला होता. नमुद वाहनावरील दोन वाहन चालक यांनी आपसात संगनमत करून सदर मालाचा स्वतःच्या फायदयाकरीता अपहार केला म्हणुन व्हि. आर. एल कंपनीच्या केशव हिरासकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयातील अपहारीत मालाचे मुल्य पाहता मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते ( भापोसे ) सोलापूर ग्रामीण यांनी सदर बाबत गांभीर्याने दखल घेत गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप व कुर्डुवाडी पोलीस ठाणेचे सपोनि विक्रांत बोधे यांना सुचना दिल्या होत्या. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांनी तात्काळ घटनास्थळास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह भेट देवुन आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकाने व कुर्डुवाडी पोलीस ठाणेकडील पोउनि हनुमंत वाघमारे व त्यांचे पथकाने आरोपीत वाहन चालक यांचा शोध घेण्यास सुरवात केली. सर्व प्रथम सदर पथकानी कर्नाटक राज्यातील हुबळी, चित्रदुर्ग, बेंगलोर, तुमकुर, हवेरी या जिल्हयातील महामार्गावरील विविध टोल नाके, हॉटेल, ढाबे, याठिकाणी जावुन आरोपीचा शोध घेतला, परंतु सदरचे आरोपी मिळुन येत नव्हते. हुबळी याठिकाणी सदर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या अधारे गुन्हयातील मुद्देमाल ज्याठिकाणी दुसऱ्या वाहनामध्ये भरला ती वाहने निष्पन्न करण्यात पथकास यश आले. नमुद गुन्हयातील एक आरोपी वाहन चालक याचा हुबळी येथे सदर पथकांनी केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे सदर आरोपी ताब्यात घेण्यास पथकास यश आले असून आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा अपहार केलेला मुद्देमाल भिमसमुद्र जि. चित्रदुर्ग येथे ठेवला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सदर तपास पथकाने समुद्र येथुन गुन्हयात अपहार केलेला एकुण ९७,६५,००० रुपये किमतीचा २१ टन वजनाचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर गुन्हयाचा पुढील तपास कुर्डुवाडी पोलीस ठाणेचे पोउनि हनुमंत वाघमारे हे करीत आहेत. गुन्हयातील आरोपीत वाहन चालक यास दिनांक २०/०५/२०२२ रोजी पर्यंत मा. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते ( भापोसे ), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, यांचे पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ / आबासाहेब मुंढे, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, सलीम बागवान पोना / रवि माने, पोकॉ / सचिन गायकवाड, तसेच कुर्डुवाडी पोलीस ठाणेचे पोउनि हनुमंत वाघमारे, पोना / सुशांत शिंदे , पोना / विश्वजित ठोंगे, पोना / व्यंकटेश मोरे सायबर सेल व टीमने बजावली आहे.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल