Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. हरीश बैजल यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ

सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. हरीश बैजल यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ

सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. हरीश बैजल यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ
मित्राला शेअर करा

सोलापूर: मा. श्री. हरीश बैजल, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, श्री. अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. संजय साळुंके, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे नियतवयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्याने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर च्या वतीने सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पोलीस आयुक्त कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, सर्व पोलीस उप – आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच कु. लक्ष्मी शिंदे, नाशिकहून सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी सायकल वरुन आलेले सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील आयुक्त साहेबांचे मित्र परिवार, शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.instagram.com/reel/CeQ8clAoVme/?igshid=YmMyMTA2M2Y=

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बापू बांगर, पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे / विशा ) सोलापूर शहर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ, सोलापूर शहर , सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मा. पोलीस आयुक्त साहेबांसोबत काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला बदल याबाबत आपले मनोगत व्यक्त करुन त्यांना भावी निरोगी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले पोलीस आयुक्तांचे चिरंजीव श्री. अभिषेक बैजल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, कार्यक्रम प्रसंगी निमंत्रित म्हणुन उपस्थित असलेले श्री. माकेश आईप, डॉ. सौ. मनिषा रौंदळ, श्री अनिल सोनवणे आणि धनंजय साळुंखे आदी इतर मान्यवर यांनी देखील पोलीस आयुक्त, श्री. हरीश बैजल यांच्या कार्याबद्दल त्यांना आलेले अनुभव त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. यानंतर सेवानिवृत्त होणारे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांचा आयुक्तालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देत असतांना पोलीस आयुक्त मा. श्री. हरीश बैजल, श्री. अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि श्री. संजय साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार, सन्मानिय मान्यवर, पत्रकार, मिडीया व इतर यांचे आपल्या भाषणातून आभार व्यक्त केले.