Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे कर्मवीर डाॅ मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र नामकरण सोहळा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे कर्मवीर डाॅ मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र नामकरण सोहळा संपन्न

मित्राला शेअर करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र नामकरण सोहळा गुरुवार दि. ९/१२/२०२१ रोजी विद्यापीठ परिसरातील सामाजिक शास्त्रे संकुल सभागृह येथे संपन्न झाला .

बार्शीला शहराला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली ती म्हणजे मामांच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून शिक्षणाचे महत्त्व ओळखून अगदी प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना झाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे यासाठी विविध शाखांमधील शिक्षण घेता यावे यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आले. संस्थे मार्फत चालवली जाणारी महाविद्यालये बराच काळ शिवाजी विद्यापीठांतर्गत कार्य करत होती परंतु प्रशासकीय दृष्टीने कोल्हापूर ते सोलापूर किंवा बार्शी हे अंतर गैरसोईचे होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ लाइव्ह

सोलापूर विद्यापीठाच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील सर्व उच्च महाविद्यालये सोलापूर विद्यापीठाशी संलग्न झाली पुढील काळात लोकाग्रहास्तव या विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले.

बार्शीला शहराला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली ती म्हणजे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून शिक्षणाचे महत्त्व ओळखून अगदी प्रतिकूल परिस्थितीत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी तळागाळातील शेतकरी, वंचित, दलित, श्रमकरी , बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे व्रत घेऊन सन १९३४ साली बार्शी येथे शिवाजी बोर्डिंग व्दारे सुरुवात केली आणि पुढे याच शिवाजी बोर्डिंगचे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या वटवृक्षात रूपांतर झाले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे यासाठी विविध शाखांमधील शिक्षण घेता यावे यासाठी महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. बराच काळ ही महाविद्यालये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत होती परंतु प्रशासकीय दृष्टीने कोल्हापूर ते सोलापूर किंवा बार्शी साठी हे अंतर गैरसोईचे होते.

जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बार्शी यांनी सदर केलेल्या प्रस्तावावर कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांनी स्वसंसाराचा त्याग करुन समाजसेवेचे व्रत घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कोणत्याही आर्थिक फायद्याकडे न पहाता एक व्रतस्थ सेवा केलेली आहे त्यांचे हे महान कार्य तळागाळातील लोकांसाठी तसेच विद्यापीठातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस दिशादर्शक ठरावे या साठी संस्थेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , सोलापूर यांचेकडे प्रस्ताव दाखल केला होता.

विद्यापीठाने समिती गठन करुन निकष ठरविले होते . सदरच्या निकषा मध्ये परिपूर्ण पात्र असणारा एकमेव प्रस्ताव असल्यामुळे व कर्मवीरांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी विद्यापीठाच्या दिनांक १६/९ /२०२१ रोजी व्यवस्थापन परिषदेमध्ये सर्व सदस्यांनी सर्वकष चर्चा करुन विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रास ” कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र ” नामाभिधान करण्यास मंजूरी देण्यात आली.

वैराग नगरपंचायतीसाठी होणारी पहिलीच निवडणुक, काही प्रभागातील भावी नगरसेवकांची मात्र निराशा

या सोहोळ्याचे उद्घाटन संस्थेचे माजी विद्यार्थी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. डॉ. जयवंतराव बोधले महाराज यांच्या हस्ते व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री. राजेंद्र राऊत ( आमदार , बार्शी विधानसभा मतदार संघ ) श्री. दिलीप सोपल ( माजी मंत्री ) श्री.आसिफ तांबोळी ( नगराध्यक्ष, बार्शी नगरपालिका ) डाॅ. बी. वाय. यादव ( अध्यक्ष, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी. पी. टी. पाटील ( जनरल सेक्रेटरी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, प्रा. महेश माने ( राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, पुअहोसोविसो )प्रा . डॉ. व्ही. बी. पाटील ( प्रभारी, प्र – कुलगुरु, पुअहोसोविसो ) डॉ. एस. के. पवार ( प्र. कुलसचिव, पुअहोसोविसो ) प्रा. डॉ. गौतम कांबळे ( प्र. संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र ) संस्थेचे सर्व संचालक सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या नामाभिधान सोहळ्याचे युट्यूबवर लाइव्ह प्रसारण विद्यापीठामार्फत करण्यात आले.