जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बाशी सदर केलेल्या प्रस्तावावर कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांनी स्वसंसाराचा त्याग करुन समाजसेवेचे व्रत घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कोणत्याही आर्थिक फायद्याकडे न पहाता एक व्रतस्थ सेवा केलेली आहे त्यांचे हे महान कार्य तळागाळातील लोकांसाठी तसेच विद्यापीठातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास दिशादर्शक ठरावे या साठी संस्थेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , सोलापूर यांचेकडे प्रस्ताव दाखल केला होता .
विद्यापीठाने समिती गठन करुन निकष ठरविले होते . सदरच्या निकषा मध्ये परिपूर्ण पात्र असणारा एकमेव प्रस्ताव असल्यामुळे व कर्मवीरांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी तसेच विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांच्या पुढे एक चांगला आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठाच्या दिनांक १६/९ /२०२१ रोजी व्यवस्थापन परिषदेमध्ये सर्व सदस्यांनी सर्वकष चर्चा करुन विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रास ” कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र ” नामाभिधान करण्यास मंजूरी देण्यात आली .
कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांनी तळागाळातील शेतकरी , वंचित , दलित , श्रमकरी , बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्याचे व्रत घेऊन सन १ ९ ३४ साली बार्शी येथे शिवाजी बोर्डिंग व्दारे आपल्या कार्यास सुरुवात केली . त्यानंतर सन १९४७ साली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बार्शी ची स्थापना करून सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काढून शिक्षण प्रसाराचे काम मोठ्या जिद्दीने व निष्ठेने केले . त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या बीजेचे रुपांतर आता वटवृक्षात झाले आहे . संस्थेच्या विविध शाखांव्दारे के.जी. ते पी.जी. पर्यंत सोय उपलब्ध आहे . कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांनी सन १९७५ मध्ये गरीब , गरजू दीनदलितांच्या आरोग्यसेवेसाठी छोटे खानी हॉस्पिटल सुरु केले आज ते ३५० बेडस्चे झाले आहे . त्यात लवकरच तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी ट्रॉमा युनिट कार्यरत होत आहे . यापूर्वी सन १९८० साली मराठवाडा विद्यापीठाने कर्मवीर डॉ . मामासाहेबांना ‘ डी.लिट . ‘ ही सन्मानाची पदवी देऊन गौरविले होते . तसेच डॉ . मामासाहेबांच्या कृषिविषयक कार्याचा गौरव करण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषिविद्यापीठाने ‘ डॉक्टर ऑफ सायन्स ‘ ही सन्मानाने पदवी त्यांना मरणोत्तर सन १९८१ साली दिली होती . कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांचे कार्य आणि कार्याची उंची पहाता त्यांचे नांव विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रास देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयामुळे कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांचे जीवन व कार्य विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थी , विद्यार्थिंनी , प्राध्यापक तसेच इतर मान्यवरांना प्रेरणा देत राहिल . सदरचे नामकरण झाल्यामुळे या भागातील सर्व स्तरातील नागरिकांना आनंद झालेला असून कर्मवीरांच्या दिशादर्शक कामाचा विद्यापीठाने यथोचित गौरव केलेला आहे , असे आम्हांस वाटते . कर्मवीरांचे विचार नवीन पिढीपुढे आणण्यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ . बी . वाय . यादव , उपाध्यक्ष श्री . नंदकुमार जगदाळे , सचिव श्री . प्रकाश पाटील , सहसचिव , श्री . अरुणकुमार देबडवार , खजिनदार जयकुमार ( बापू ) शितोळे यांनी मा . कुलगुरु , व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठ प्रती कृतज्ञता व्यक्त केली .
Dr karmveer Mamasahebancha karyakartutvacha Ahilyadevi Holkar vidyapithane uchit Gaurav kela yacha amha karmveer samuhala Abhiman ahe