Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > सोलापूर झेडपी शाळांना आले 248 नवे शिक्षक

सोलापूर झेडपी शाळांना आले 248 नवे शिक्षक

सोलापूर झेडपी शाळांना आले 248 नवे शिक्षक
मित्राला शेअर करा

खाजगी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन आणि पवित्र पोर्टल द्वारे भरती झालेल्या नव्या 248 शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात आता प्रक्रिया राबवली जाणार असून नवीन आलेल्या शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टल द्वारे मराठी माध्यम साठी नव्याने 223, कन्नड माध्यम साठी 10 व उर्दू माध्यम साठी 15 असे एकूण 248 शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाले आहेत.

या नव्याने आलेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी सोमवार आणि मंगळवारी चालणार आहे. ही तपासणी जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृह या ठिकाणी होणार असून सोमवारी 1 ते 125 आणि मंगळवारी 126 ते 248 एवढ्या शिक्षकांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.