Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > सोलापुरात उद्या युवा सेनेचा मेळावा

सोलापुरात उद्या युवा सेनेचा मेळावा

सोलापूर दि. २६- शहर जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मित्राला शेअर करा

या मेळाव्यास युवा सेनेचे प्रदेश सचिव वरूण सरदेसाई व युवा सेनेचे संपर्कप्रमुख तथा माजीमंत्री तानाजी सावंत यांच्यासह कोअर कमिटीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणूक तसेच आगामी काळातील सर्व स्तरावरील निवडणुका यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे.

सरदेसाई हे या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रभर निश्चय दौरा करीत असून या मेळाव्यास शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे , असे आवाहन काळजे यांनी केले आहे.
यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. दयानंद शिंदे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहरप्रमुख सुजित खुर्द, गणेश भोसले आदी उपस्थित होते.