जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ( रुसा ) यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

प्रकल्प मंजूर करून राज्य शासनाच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यावर पुरातत्वशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांकडून संशोधन सुरू आहे, त्याचबरोबर तेथील डाटा कलेक्शनचेही काम चालू असून याचबरोबर पुरातन वस्तू , शिल्प यांचे संग्रहालयदेखील उभारण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे. अतिशय पारदर्शी व स्वच्छ काम येथे झाल्याची माहिती पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले