Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > सोलापूरच्या प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ची लेक्ट्रिक बस-पहा व्हिडीओ

सोलापूरच्या प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ची लेक्ट्रिक बस-पहा व्हिडीओ

मित्राला शेअर करा

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडने कंपनीने PCL X EMOSS – India eBus चा व्हिडिओ व छायाचित्रे लाँच केले आहेत . प्रिसिजन कॅमशाफ्ट्सने मध्यम आकाराच्या पॅसेंजर एसी बसला १०० % इलेक्ट्रिक बसमध्ये बदलले आहे . ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( ARAI ) मध्ये याची चाचणी घेतली जात आहे .

भारतातील सार्वजनिक रस्त्यांवर चालवल्या जाणाऱ्या PCL ची ही पहिली ELECTRIC retrofitted मध्यम आकाराची प्रवासी बस आसणार आहे नेदरलँडमध्ये डिझाइन केलेले आणि विकसित केलेली आणि भारतातील भूमित तयार केलेले , ही बस पीसीएल प्रवासात एक milestone असणार आहे , कारण भविष्यात कंपनी भारतीय स्थानिक ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक बस , ट्रक आणि एलसीव्ही निर्मिती करणार आहे .

कंपनीने आगामी वाहनांमध्ये आणखी स्वदेशीकरण करण्याचे लक्ष्य ठेवून पहिल्या वाहनातच 60 % पेक्षा जास्त इलेक्ट्रिक ड्राइव्हलाईनचे स्थानिकीकरण केले आहे . ही बातमी कळल्यापासून प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड चे शेअर्स बीएसई मध्ये उसळी घेत आहेत . सोलापूरकरांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे