सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातले असले तरी देवस्थान कडून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दर्शनास येण्यास इच्छुक भाविकांनी ऑनलाईन पास बुकिंग करून स्वतःचे दर्शन पास काढून घ्यावे . पास काढण्यासाठीची प्रक्रिया :

- भाविकांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून दर्शन संकेतस्थळावर जावे , तिथे दर्शनासाठी आवश्यक असणारे सर्व नियम दिलेले आहे , ते वाचून भाविकांनी त्या खाली दिलेले दर्शन पास चे फॉर्म भरावे .
- भाविकांना फॉर्ममध्ये दर्शनाची तारीख दर्शनासाठीचे वेळ निवडायचे आहे आणि त्याखाली स्वतःचे व दर्शनासाठी सोबत येणाऱ्या भाविकांची माहिती भरायची आहे . 3. माहिती पूर्ण भरून झाल्यांनतर जे पास दिसेल त्या पासचे स्क्रिन शॉट काढून घ्यावे आणि दर्शनास आल्यानंतर ते स्क्रिन शॉट दाखवणे आवश्यक आहे .
श्री सिद्धेश्वर देवस्थान दर्शन पास लिंक
http://www.shrisiddheshwardevasthan.com
भाविकांसाठी नियम :-
▪︎सर्व भाविकांनी खालील नियमांचे पालन करावे हि नम्र विनंती …
▪︎दर्शन पास फक्त वय वर्षे १८ ते ६५ वयापर्यंत व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.
▪︎भाविकांनी जेष्ठ व्यक्ती व लहान मुलांना आणू नये.
▪︎भाविकांनी मास्क चा वापर करणे आवश्ययक आहे.
▪︎भाविकांनी सामाजिक अंतर(सोशल डिस्टेंसिंग) चे नियम पाळावे.
▪︎भाविकांनी २ कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेले असणे आवश्यक आहे व त्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
▪︎भाविकांजवळ आधार कार्ड/ पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार आयडीचे कोणतेही १ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
▪︎भाविकांनी कमीतकमी ६ फूट अंतर इतरांपासून पाळावे.
▪︎भाविकांनी पासमध्ये दर्शनासाठी निवडलेल्या वेळेत दर्शन घ्यावे निवडलेल्या वेळेनंतर प्रवेश दिले जाणार नाही.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ