सोलापूर जिल्ह्यामध्ये विस्मयकारक जैविक विविधतेची खाण आहे त्यापैकी माळढोक किंवा काही विशेष जिव सोलापूर जिल्ह्यात आढळून येतात मध्यंतरी दुर्मिळ Indian Fox म्हणजेच पांढरे खोकड आढळून आले
सोलापूर माळरानावर आढळणाऱ्या सुंदर, मनमोहक असा Fan throated Lizard ( रंगीत फॅन काढणारा सरडा ) याचे छायाचित्र युवा फोटोग्राफर रत्नाकर हिरेमठ यांनी काढले होते.
छायाचित्रातील सरडा एखादा महागडा पोषाख परिधान करून रुबाबात फिरल्यासारखा दिसतो आहे. पंख्याच्या गळ्याचे सरडे त्यांच्या घशाखाली ‘डेवलॅप’ नावाचा एक अनोखी, सैल त्वचा असते जी संभाव्य जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी ते प्रदर्शित करतात.
हे मोहक छायाचित्र @natgeoindia इन्स्टाग्राम पेज वर पोस्ट करण्यात आले आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे.
सोलापुराची जैवविधता हा वारसा जपला पाहिजे त्याला पाहणे विवेकी भावनेने आनंद घेणे जपणे आणि सुखरूप ठेवणे ही आपली जवाबदारी आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ