भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नावाची केंद्रीय कायदा व न्याय मंत्री यांच्याकडे शिफारस केली आहे.

लळित यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळित यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळित सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते. भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरातील हरिभाई शाळेत झालेले हरिभाई प्रशालेचे माजी विद्यार्थी त्यांचे घर हे आपल्या सुभाष चौकातील बँक ऑफ इंडिया (प्रियांका ज्यूस) शेजारी आजही आहे सोलापुरसाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक