मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी रक्तदान शिबीराचे आव्हान केल्याने कोरोना कालावधीत भूम, परंडा, वाशी तालुक्यात रक्तदान शिबीर सोमनाथ कोकाटे यांनी घेतली व सध्या पण घेत आहेत. तसेच गोरगरीब, शेतकरी, शासकीय कर्मचारी,लहान बालक, गरोदर महिला, शस्त्रक्रिया अशा विविध गरजु रुग्णांना मोफत व अल्प दराने उस्मानाबाद व बार्शी जि.सोलापूर येथे रक्ताचा पुरवठा केलेला आहे.
पंढरपूर येथे स्व.आशा कदम फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव पवार यांनी २६ फेब्रुवारी २०२२ रोजी सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन केले होते.
सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती उस्मानाबाद यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
परंतु हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून विश्व जन आरोग्य सेवा समिती मधील सर्व पदाधिकारी तसेच विश्व जन आरोग्य सेवा समिती धाराशिव पदाधिकारी व विश्व मराठा संघ पदाधिकारी, भूम-परंडा-वाशी रक्तदाते आणि भगवंत ब्लड बँक बार्शी जि.सोलापूर, शहा ब्लड बँक बार्शी जि.सोलापूर आणि सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांनी वेळोवेळी ब्लड संकलन करून वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे आहे त्यामुळे व पत्रकार बंधु या सर्वांचा पुरस्कार आहे असे सोमनाथ कोकाटे यांनी सांगितले.
राहुल वाणी, बार्शी
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर