Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > कोकणातील काजुर्ली ता. गुहागर मधील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी सोनाली डिंगणकर हिची नासा इस्रो भेटीसाठी निवड

कोकणातील काजुर्ली ता. गुहागर मधील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी सोनाली डिंगणकर हिची नासा इस्रो भेटीसाठी निवड

कोकणातील काजुर्ली ता. गुहागर मधील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी सोनाली डिंगणकर हिची नासा इस्रो भेटीसाठी निवड
मित्राला शेअर करा

परंपरा व पीठिकाच्या जाळ्यात अडकलेल्या समाजात एका ग्रामीण ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीची नासा/इस्रो भेटीसाठी निवड हि बाबा नक्कीच अभिमानस्पद आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या “जाणू विज्ञान,अनुभवू विज्ञान” उपक्रमांतर्गत घेण्यात आलेली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा ह्या परीक्षेत उत्तुंग यश गुहागर तालुक्यातील काजुर्ली (मानवाडी) गावची सुकन्या व जि.प.शाळा काजुर्ली नं.२ ह्या शाळेची विद्यार्थिनी सोनाली मोहन डिंगणकर हिने प्रथम केंद्र, बिट, तालुका व जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध चाळणी परिक्षांमध्ये यशस्वी ठरली.

ठराविक प्रश्न व प्रयोग करणे अशा स्वरूपातील ही परीक्षा होती. यामध्ये अभिमान वाटणारी बाब म्हणजे शेतकरी कुटुंबातील जन्मलेली, कुणबी भूमिपुत्र असणाऱ्या व मुंबईत खाजगी नोकरी करत कौटुंबिक उदरनिर्वाह करणाऱ्या वडिल मोहन डिंगणकर यांची ती कन्या आहे. ह्या परीक्षेत ९ तालुक्यातील विद्यार्थी सहभागी होते. ह्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाची अंतराळ संशोधन करणारी संस्था इस्रो व अमेरिकेची नासा याठिकाणी भेट देऊन तिथल्या कार्याची माहिती घेता येणार आहे.

आता हुशार असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि संशोधक वृत्तीला वाव देणे, त्या दृष्टीने ही उचलली जाणारी पाऊले कौतुकास्पद आहेत. सोनालीच्या यशामध्ये तिचे आई-वडील,शाळेतील शिक्षक – दशरथ साळवी (मुख्याध्यापक) सहा.शिक्षिका – पूनम माने व शिक्षक कर्मचारी सुनिल गुडेकर व गावचा पाठींबा यांचं योगदान मोठं आहे. सोनालीचे मनापासून अभिनंदन.