बार्शी शहर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण सोलापुर मागील सुमारे एक वर्षापासुन बार्शी शहर, सुभाष नगर, वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पीटल परिसरात नागरीकांच्या घराच्या दरवाज्याचा कोयंडा कटावणीने तोडुन, उचकटुन घरात प्रवेश करून घरातील व्यक्तीना मारहाण व चाकुचा धाक दाखवुन घरातील सोन्या चांदीचे दागीने, रोख रक्कम अश्या मौल्यवान वीजवस्तु अज्ञात आरोपी घेवुन गेलेले होते. अश्या प्रकारचे एकुण ०५ दरोडयासारखे गुन्हे घडलेले होते.
या संदर्भात बार्शी पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे घडल्या ठिकाणची ग्रामसुरक्षा यंत्रणा स्थापन करून कार्यान्वीत केली. सदर भागात नागरीकांना घेवून रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्यात आली.
सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत सोलापूर जिल्हा एस. पी. तेजस्विनी सातपुते यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा बार्शी पोलिस निरीक्षक शेळके साहेब उपनिरीक्षक उद्धार उपनिरीक्षक प्रवीण शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्यांची दोन पथके तयार करण्यात आली होती.
या पथकाने परभणी, सिंदखेड राजा, औरंगाबाद येथुन काही संशयित आरोपींना अटक करून गुन्ह्या बबात सखोल तपास केला तसेच मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे किर्तीनगर अक्कलकोट रोड सोलापुर दरोडयातील काही संशयीत आले असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जाउन छापा टाकला असता याठिकाणी तीन आरोपी वैराग ता. बार्शी आरोपी, ता. मुरुड जि.लातुर आरोपी व भोसा ता. जि. लातुर यांना ताब्यात घेतले व त्यांची घरझडती घेतली असता दरोडे घालण्यासाठी वापरत असलेली हत्यारे व गुन्हयातील काही सोन्याचे दागीने मिळुन आले.
सदर आरोपीना अटक करून गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी बार्शी शहरात गुन्हे केल्याची कबुली देवून दरोडे टाकल्याची ठिकाणे दाखवली. अधिक तासात त्यांचे इतर साथीदार आरोपी वैराग, परांडा व तुळजापुर हे ३ आरोपी तपासात निष्पन्न झाले . अटक आरोपीकडुन पोलीस कोठडी दरम्यान गुन्हयातील सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले. सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे ४ व ५ यांना स्थानीक गुन्हे शाखा सोलापुर यांनी वैराग येथे पकडुन बार्शी शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात दिल्याने त्यांना अटक केली.
त्यांनी सदर गुन्हयातील सोन्याचे दागीने हे बार्शी शहरातील सराफा यांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने बार्शीतील दोन सराफांना तपास कामी अटक करण्यात आलेली असुन त्याचेकडुन काही सोन्याचे दागीने व लगड हस्तगत करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे सध्या अटकेत असुन इतर गुन्हयाचा तपास चालु आहे आरोपीना अटक करून त्याचेकडे तपास केला असता त्यांनी बार्शी शहरातील खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
दरोडयातील गेला एकुण मुद्देमाल ४४ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागीने ( २२,३५,००० ) व ३ भार चांदीच्या वस्तु ( १२,००० ) व रोख रक्कम ८५,००० / – रोख रक्कम . असा एकुण . २३,३२,००० / मुद्देमालातील एकुण ३५ तोळे ०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने कि.रू .१७,७०,००० / – व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकली कि.रु .७०,००० / – असा एकुण १८,४०,००० / – रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद