Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील राजाराम माने यांना राज्यस्तरीय ज्ञानदुत पुरस्कार

बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील राजाराम माने यांना राज्यस्तरीय ज्ञानदुत पुरस्कार

बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील राजाराम माने यांना राज्यस्तरीय ज्ञानदुत पुरस्कार
मित्राला शेअर करा

बार्शी : मानवाधिकार फाउंडेशन मार्फत सामाजिक राजकीय आरोग्य क्षेत्रातील आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्याना राज्यस्तरीय आपले मानवाधिकार ज्ञानदुत पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.

बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे प्रयोगशाळा सहायक या पदावर कार्यरत असणारे श्री राजाराम तायाप्पा माने यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार म्हणजे व्यक्तीने किंवा संस्थेने त्या त्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव असतो जी मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्या हातात पाटी, पेन्सिल देण्याचं काम मतिमंद मुलांची निवासी शाळा स्थापन करून अनेक मुलांना गेली १४ चौदा वर्ष झाली कार्यरत विनाअनुदानित शिक्षणचा लाभ दित आहेत. त्यामुळे त्यांना आपले मानवाधिकार फाउंडेशनने त्यांचा गौरव केला. कार्य, कर्तुत्व आणि माणसे मोठे होतात. आपले माननीय मानवाधिकार फाउंडेशनने यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा राळेगणसिद्धी येथे पार पडला.

सदर कार्यक्रमास पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर आप्पा जाधव, डॉक्टर दीपेश पष्टे, ॲड. दिवेश पष्टे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी रामराजे सूर्यवंशी, मयुर माने, आपले मानवाधिकार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पुरस्कारर्थी व मान्यवर उपस्थित होते.