दिनांक -7/1/2025 व 8/1/2025 या कालावधीत नांदेड जिल्हा येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन च्या मान्यतेने व ऑल नांदेड जिल्हा वूशू असोसिएशन आयोजित 22 वि राज्यस्तरीय सीनियर (महिला व पुरुष) वुशू अजिंक्यपद स्पर्धा – 2025 स्पर्धेत बार्शी च्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब ची खेळाडू कु. नेहा घाडगे हिने महिला गटात झालेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
नेहा घाडगे हिला संस्थेचे अध्यक्ष – भगवान जाधव सर, वूशू प्रशिक्षक फुलचंद जावळे सर संस्थेचे सचिव. सौ. सविता जाधव, उपाध्यक्ष गणेश रोडे सर, संचिती जाधव, स्नेहल रोडे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
नेहाच्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड