डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 92 व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम आयोजित TechXcelerate या नॅशनल रोबोटिक कॉम्पिटेशन चे आयोजन दिनांक 06 ऑक्टोंबर 2023 रोजी श्री.शिवाजी इन्स्टिट्यूट परभणी येथे पार पडले यामध्ये देशभरातून महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडूसह विविध राज्यातून 153 विज्ञान साहित्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
या नॅशनल रोबोटिक कॉम्पिटिशन मध्ये महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅब मधील साहित्याचा वापर करून चि.तनवीर तांबोळी, चि.अर्सलान सय्यद व चि.श्रेयस जगताप या विद्यार्थ्यांनी हुमोनाईड रोबोट चे सादरीकरण केले व प्रशालेच्या इतिहासात पहिल्यांदाच विज्ञान क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. यावेळी विज्ञान शिक्षक श्री.संग्राम देशमुख व सचिन देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पुतणे ए.पी.जे.एम.जे. शेख दाऊद, ए.पी.जे.एम.जे.शेख सलीम, डॉ.कलाम यांच्या सोबत संशोधन केलेले शास्त्रज्ञ डॉ.दिलीप देशमुख, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.इंद्र मणी, पोलीस अधीक्षक मा.रागसुधा आर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या नॅशनल रोबोट कॉम्पिटिशन मध्ये निवड झालेल्या प्रयोगांसाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जन्मगाव रामेश्वरम येथे इस्रोचे चेअरमन चंद्रयान 3 चे प्रमुख डॉ.एस.सोमनाथ यांचे कडून प्रयोगाच्या पेटंट साठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. श्री.बी. वाय.यादव साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव मा.श्री.पी. टी.पाटील साहेब,संस्थेचे सहसचिव मा.श्री.अरुणजी देबडवार सर,संस्थेचे खजिनदार मा.श्री.बापूसाहेब शितोळे,संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यालयाच्या शाळा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस. सी.महामुनी विज्ञान विभाग प्रमुख श्रीम.हाजगुडे एस.एम. सर्व विज्ञान शिक्षक,शिक्षिका, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद