बार्शी:- विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने इयत्ता 6 वी व 9 वी मधील विद्यार्थीनीसाठी घेण्यात आलेल्या प्राविण्य परीक्षेत कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश मिळवले.

कु. श्रावणी आळे, तन्वी मठ, आलिया तांबोळी, समृद्धी घोलप, मोहिनी चव्हाण, नंदिनी परदेशी, अंकिता सराफ, प्राची फुगे या विद्यार्थीनी प्रज्ञा परीक्षेस पात्र ठरल्या. सर्व यशस्वी विद्यार्थींनीचे मुख्याध्यापिका शुभदा जोशी संस्थेच्या संचालिका वैष्णवी हातोळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले.
या विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षिका उषा वीर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश घाडगे,आयुब शेख,ज्योती अगरवाल या विज्ञान व गणित विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल