Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > सुनील दत्त व नर्गिस दत्त यांच्या भित्तीचीत्राचे अनावरण

सुनील दत्त व नर्गिस दत्त यांच्या भित्तीचीत्राचे अनावरण

बार्शीतील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे सुनील दत्त व नर्गिस दत्त यांच्या भित्तिचित्राचे अनावरण
मित्राला शेअर करा

बार्शी येथील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत मोलाचे योगदान असणारे सिने अभिनेता तथा माजी खासदार कै. सुनीलजी दत्त व कै. नगीस दत्त यांच्या भित्तीचीत्राचे अनावरण संस्थेचे चेअरमन तथा कार्यअध्यक्ष माजी मंत्री दिलीपरावजी सोपल यांच्या हस्ते करण्यात आले.

बार्शी शहरामधील सुभाष नगर येथे स्थित असणाऱ्या Nargis Dutt Memorial Cancer Hospital Barshi येथे कॅन्सर रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येतात
अनेक वर्षांपासून बार्शी सारख्या छोट्या शहरात असणारे ग्रामीण भागातील एकमेव अद्ययावत हॉस्पिटल कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार करायचे काम करत आहे.

स्वर्गीय सुनील दत्त यांचे बार्शीतील या हॉस्पिटलशी भावनिक संबंध राहिलेले आहेत. आजपर्यंत हजारो कॅन्सर पीडित रुग्णांचे प्राण वाचण्याचे काम या रुग्णालयाच्या माध्यमातून झाले आहे.

यावेळी संचालक मंडळ, सदस्य, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.