उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून जाणार्या या महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी मोजणी प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण होत आली आहे. खूप मोठे क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे परंतु ज्या गट नंबर मध्ये मार्कींग झाले त्या शेतकर्यांच्या मनामध्ये दर किती मिळणार हेच माहीत नसल्यामुळे भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांमधील हा संभ्रम दूर करण्यासाठी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय नेत्यांनी यात लक्ष घातलेले नाही हे विशेष.
सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाच्या केंद्रीय दिशादर्शक समितीचे चेअरमन खासदार सदाशिवराव लोखंडे यांना निवेदन
ग्रीनफील्ड महामार्ग जात असणाऱ्या व नव्याने सर्वे केलेल्या नगर चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण भातोडी, मदडगाव,कोल्हेवाडी, सारोळा, शहापूर येथील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत.

यामध्ये शेतकऱ्यांचे बागायती जमीनी,घरे, गोठे, भुसारे, पाईपलाईन, विहीरी, शेत तलाव, फळबाग, पोल्ट्रीफार्म, शेड, यासारखी शेती उपयोगी साधनांचे मोठे नुकसान होत असून व या साधनसामुग्रीची सातबारा तलाठी रेकॉर्डला नोंद करून घेण्यात यावी व नगर जामखेड नगर पाथर्डी हायवे लगतच्या जमिनी बाबत संबंधित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक लावून जमिनीचे व सर्व नुकसान होणाऱ्या साधनसामग्रीचे भरपाई चे दर जाहीर करावे व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सुरू करावी ही मागणी नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरदभाऊ पवार नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रोहिदास पाटील कर्डिले, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रकाशजी पोटे, व शेतकरी यांनी खासदार लोखंडे यांच्याकडे केली.
ग्रीनफिल्ड महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक लावू असे आश्वासन खासदार लोखंडे यांनी दिले.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ