सोलापूर,: सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. या प्रोजेक्ट साठी बारा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 15 गावे, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 16 अशा 35 गावातून महामार्ग जाणार असून 5 जून 2022 पासून रोव्हरद्वारे मोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सुरत-चेन्नई नवीन महामार्गाच्या मोजणी पूर्वतयारीचा आढावा श्री. शंभरकर यांनी नियोजन भवन येथे घेतला. बैठकीला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या सक्षम अधिकारी अरूणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, अनिल विपत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सुरत-चेन्नई महामार्गासाठी तिन्ही तालुक्यातील जमिनीची मोजणी 5 जून ते 25 जून दरम्यान करण्यात येणार आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर