वैराग ता. बार्शी येथे उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक दर्शनासाठी शिवभक्तांनी खुले केले. गेल्या २ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लालफितीमुळे झाकून ठेवले होते.
स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या आठवड्यात ट्विट करत स्मारक खुले करण्याची मागणी केली होती. तसेच स्वराज्य चे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, राहूल शिंदे, महादेव तळेकर, ॲड. विलास पवार, महेश गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी वैराग मध्ये स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला इशारा देत १५ जुलै पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्या अगोदरच स्थानिक शिवभक्तांनी झाकून ठेवलेले शिवस्मारक खुले केले.
छत्रपती संभाजीराजे १६ जुलै रोजी शिवस्मारकाच्या दर्शनाला येणार!
येत्या १५ व १६ रोजी स्वराज्य संघटनेचे ‘स्वराज्य संकल्प अभियान’ बार्शी येथे होत असून, त्यासाठी बार्शी व वैराग भागाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर छत्रपती संभाजीराजे येत आहेत. स्वराज्य संघटनेच्या जवळपास ४० शाखांचे उद्घाटन होणार असून शनिवार, दि. १५ रोजी पांडे चौक, बार्शी येथे व रविवार, १६ जुलै रोजी वैराग येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे शिवस्मारकाचे दर्शन घेणार असून या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातून शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद