संत रोहिदास समाज विकास संस्था धनकवडी पुणे यांच्या वतीने रविवारी बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात चर्मकार समाजातील प्रथम वधूवर, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नौकरदार विधुर व अपंग यांच्यासाठी मेळावा संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजाभाऊ शिंदे, श्री लोकरे साहेब, दत्तात्रय (दादा) मस्तुद, रंगनाथ मस्तुद, श्री सुनील मस्तुद साहेब उपस्थित होते. समाज विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. सुखदेव सुर्यवंशी, अशोक कांबळे, चंद्रकांत कांबळे, भालचंद्र गोरेगावकर, व दशरथ बनसोडे यांनी आपले मत व्यक्त करुन उपयुक्तता सांगितली.
सदरील मेळाव्यात परांडा, भुम, करमाळा, धाराशिव, सोलापूर, बार्शी व कुर्डुवाडी या परिसरातील 51 वधूवरानी आपला नोंदणी केली.
सदरील मेळावा यशस्वी करण्यासाठी कृषी उद्योग मार्गदर्शक श्री. अमोल वाघमारे, श्री अनिल कांबळे, श्री. सुर्यकांत गोपीनाथ गायकवाड, श्री. शिवाजी कांबळे व श्री. महादेव शिंदे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न