चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले.
२०१८ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते.
छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता.
दिल्ली येथील संभाजी राजे यांच्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांचा इतिहास जाणून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने त्यांनी नवीन राजवाड्यास (New The palace ) भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता.
जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे…. संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असे उद्गार संभाजी छत्रपती यांनी काढले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत , श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले . छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता . जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते . त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असे संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे.
जनरल बिपीन रावत हे थलसेना प्रमुख असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये कोल्हापूर येथे १० ९ मराठा लाइट इन्फंट्री प्रादेशिक बटालियनच्या कार्यक्रमास आले होते . यावेळी छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या नवीन राजवाड्यास अत्यंत आपुलकीने भेट देऊन स्नेहभोजन केले होते.
जनरल रावत, श्रीमती मधुलिका रावत व त्यांच्यासोबतच्या अकरा योद्ध्यांना भावपूर्ण श्रध्दांजली..!
ऐतिहासिक क्षण पहिल्यांदाच बार्शीतून धावली विद्युत रेल्वेगाडी
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद