Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शालेय साहीत्य देवुन साजरा केला

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शालेय साहीत्य देवुन साजरा केला

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शालेय साहीत्य देवुन साजरा केला
मित्राला शेअर करा

बार्शी : भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेतील सहशिक्षक श्री गणेश कदम सर हे आपल्या मुलींचे वाढदिवस दरवर्षी सामाजिक कार्य करून साजरा करत असतात या वर्षीदेखील त्यांनी आपल्या जान्हवी गणेश कदम या मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्य करत साजरा केला.

बार्शीमध्ये झाडावर प्रेम करणारी झाडासाठी काम करणारी संस्था या वृक्ष संवर्धन समितीला निधी दिला तसेच ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेला पण त्यांनी मदत निधि दिला. तसेच भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित शिवस्मृती बालवाडी केंद्र बार्शी या शाळेतील मुलांना वह्या वाटप केल्या तसेच त्याच भागातील डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन न.पा शाळा क्र १८ या गरज ओळखुन मुलांना उपयोगी पडणारा फळा देण्यात आला.त्याच बरोबर कासारवाडी रोडवर असणारी डाॅ बाबासाहेब आंबेडकर न.पा.शाळा क्र ७ या शाळेला भेट देत मुलांना वह्या, पेन्सील ,खाऊवाटप केले.अशा पध्दतीने या वर्षीचा वाढदिवस साजरा केले.

यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, नागनाथ सोनवणे तसेच महमंद रफिक तांबोळी यांनी उपस्थित राहुन वाढदिवसाची शोभा वाढवली. असे वाढदिवस आपण मुलींचा करावा आपण मुलांचे वाढदिवस खुप खुप मोठे करतो पण मुलीचा वाढदिवस आपण करत नाही आपण मुलगा मुलगी भेदभाव न करता दोन्हि समान आहेत हे या वाढदिवसातुन सांगण्याचा उद्देश आहे असे शाळेचे शिक्षक श्री गणेश कदम सर यांनी सांगीतले.