१४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन म्हणुन साजरा केला जातो, पण ह्याच दिवशी अनाथांची आई सर्वांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचा वाढदिवस सुद्धा याच दिवशी असतो, सुर्योदय वृध्दाश्रमाच्या संस्थापक अध्यक्षा- सौ. छायाताई भगत यांनी माईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुर्योदय वृध्दाश्रम कडुन माईंचा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.






माईंनी आयुष्य अनाथांसाठी वाहून दिलं अनेकांना पुनर्जिवन दिले अशा माईंचा वाढदिवस 13/14/15 नोव्हेंबर रोजी साजरा केला..
13 नोव्हेंबर रोजी रस्त्यावर असणार्या भिकार्यांना जेवण देण्यात आले.
14 नोव्हेंबर रोजी सुर्योदय वृध्दाश्रम मध्ये चिमुकल्या लेकरांना गोळा करून त्यांना खाऊ दिला.
15 नोव्हेंबर रोजी ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन मतिमंद मुलांना खाऊ वाटप करुन माईंचा वाढदिवस साजरा केला.. अशा विविध उपक्रमांनी माईंचा वाढदिवस साजरा करून माईंना विनम्र अभिवादन केले..

तेजस्वी फाउंडेशन संचलित सुर्योदय वृध्दाश्रम
सौ. छायाताई भगत- संस्थापक
9604516553
सुर्योदय वृध्दाश्रम / राधा सुभाष लाटे.
9921912727
tejaswifoundation2013@gmail.com
पत्ता:- गुरुकृपा बिल्डिंग, धायरी- डि. एस. के. रोड धायरी, पुणे- ४११०४१.
आपण सुद्धा जेष्ठांसाठी सुरु झालेल्या उपक्रमास (वृध्दाश्रमास) एकदा अवश्य भेट द्या
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ