Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी :- धाराशिव तालुक्यातील तेर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा शाळा महाविद्यालये अंगणवाडी त्याचबरोबर विविध शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या मुर्तींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर गावांतून लेझीम व झांज पथक मुलीच्या विविध प्रकारच्या कलाविष्काराचे सादरीकरण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

तसेच जुन्या ग्रामपंचायत कार्यालय येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तसेच नृसिंह वेस येथील शिवनृसिंह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर अंगणवाडी क्रमांक ५१८ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती अर्चना सोणवणे, मदतनीस मिरा खरात, तुषार बुके, अविनाश इंगळे , सुरज पांगरकर , सिध्देश्वर शिराळ , अभिजित लामतुरे , आदिंसह बालके उपस्थित होते