Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > तेर येथे हेरिटेज वॉकमधून ऐतिहासिक, पुरातत्वीय वारशाबाबत जनजागृती!

तेर येथे हेरिटेज वॉकमधून ऐतिहासिक, पुरातत्वीय वारशाबाबत जनजागृती!

तेर .. येथे पर्यटन महोत्सवास हेरिटेज वॉकने उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली.
मित्राला शेअर करा

संत गोरोबा काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे हिंदू जैन, बौद्ध धर्माचा ऐतिहासिक वारसा पाहिला मिळतो आजही तेर परिसरात प्राचीन ऐतिहासिक अवशेष व साधने उत्खननात आढळून येतात त्यामुळे येथील इतिहासाच्या पाऊलखुणांना धर्माच्या नजरेतून न पाहता तो आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे, या नजरेतून पाहणे आवश्यक आहे, असे मत येथील. रामलिंग आप्पा लामतुरे शासकीय पुराण वस्तू संग्रहालयाचे सहायक अभिरक अमोल गोटे यांनी व्यक्त केले.

तेर पर्यटन महोत्सवास रविवारी हेरिटेज वॉकने प्रारंभ झाला याअंतर्गत येथील ऐतिहासिक वारसास्थळांना भेटी देण्यात आली यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, तहसीलदार गणेश माळी उपसंचालक विजय जाधव गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी म्हणाले, इ. स. पहिले, दुसरे ते तिसरे शतकात या ठिकाणी विविध कलाकुसरीचा उदय होऊन विविध कर्णभूषणे, मातीच्या केओलिनच्या उत्कृष्ट मूर्ती, अलंकार साचे हस्तिदंती आदी वस्तूची निर्मिती होत होती. या काळात तेर हे गाव जागतिक बाजारपेठ केंद्र असल्याचे पुरावे आज ही आढळून येतात याच काळात आयात – निर्यात वाढली तेर येथून व तेर मार्गे परदेशात माल पाठवला जात असे.

तेर येथे हेरिटेज वॉकमधून ऐतिहासिक, पुरातत्वीय वारशाबाबत जनजागृती

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र पर्यटन संचलनालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची सुरुवात हेरिटेज वॉकसह चित्रकला स्पर्धा घेऊन करण्यात आली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचा बहुमान आमदार राणा जगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अर्चना ताई पाटील यांना मिळाला.

हेरिटेज वॉकचा शुभारंभ कै.रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयापासून करण्यात आला. चैत्यगृह, संत गोरोबाकाका मंदिर, कालेश्वर मंदिर, तीर्थकुंड, उत्तरेश्वर मंदिर, त्रिविक्रम मंदिर, संत गोरोबाकाका जन्मस्थळ आदी प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत इतिहास जाणून घेतला.

महाराष्ट्र संत विद्यालयात, छत्रपती शिवाजी महाराज व संत गोरोबाकाका यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

पुरातन संंस्कृतीचा वारसा लाभलेल्या व महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेल्या तेरचा समृद्ध इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी व तेरचा जुना इतिहास, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन अवशेषांसह पुरातन वास्तूंच्या पाऊलखुणांची ओळख पर्यटकांना करून देणे हा मुख्य उद्देश ठेऊन आयोजित केलेला हा हेरिटेज वॉक अत्यंत माहितीपूर्ण होता. आपल्या भागाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अशा कार्यक्रमांमार्फत होत असते असे आमदार पाटील म्हणाले.