Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > तेर येथील रक्तदान शिबिरात 21 तरुणांचे रक्तदान

तेर येथील रक्तदान शिबिरात 21 तरुणांचे रक्तदान

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील निळा झेंडा चौक येथे सोमवार दिनांक १८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी ( हरी खोटे ) उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील निळा झेंडा चौक येथे सोमवार दिनांक १८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते


यावेळी या रक्तदान शिबीरात २१ तरुणांनी रक्तदान केले
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध , क्रांतीसुर्य महात्मा फुले , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे रुग्ण कल्याण समिती सदस्य जुनेद मोमीन, दिपक गायकवाड, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बाबासाहेब गायकवाड, भिवाजी वाघमारे, चंद्रकांत सोनवणे, सतीश जाधव, ऊलास सोनवणे, भगवान खंदारे, श्रीमती अंलका सोनवणे, सुमेध वाघमारे, शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

दरम्यान या रक्तदान शिबिरात विष्णु गाल्टे, अनिल बगाडे, शंकर कदम, प्रकाश सोनवणे, विशाल सोनवणे, किरण पेठे, ऋतूक जाधव, निखिल खंदारे, राज कांबळे, अरुण सोनवणे, शुभम कांबळे, आकाश सोनवणे, श्रीकांत सोनवणे, अभिजीत गायकवाड, मंगेश वाघमारे, अभिजीत सावंत, ऋषिकेश कांबळे, शुभम वैरागे शुध्दोदन धावारे, सुमेध वाघमारे, शशिकांत सोनवणे आदी तरुणांनी शिबिरात रक्तदान केले

यावेळी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी प्रणाली महादेव कोरे यांच्यासह फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले