तेर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत तेर ता. धाराशिव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सुनिता निवृत्ती माने यांनी जिल्हास्तरीय समूह नृत्य समूहगीत गायन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला, त्याचबरोबर युगलगीत गायनात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने सहशिक्षिका श्रीमती सुनिता माने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख आर. पी. पडवळ, मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे, डी. आर. थोडसरे, बी. व्ही. कानडे, चंदनशिवे, श्रीमती एस. पी. पांढरे, एस. पी. राठोड, एन. जे. अन्सारी, आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
More Stories
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,२०१४
राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन देवकते यांची निवड
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यासांठी वैद्यकीय मार्गदर्शन शिबीर संपन्न