तेर प्रतिनिधी – हरी खोटे जि. प. प्रा स्पेशल शाळा तेर या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याने इंग्रजी च्या WPC ( वर्ड पॉवर चॅम्पियनशिप ) या राज्यस्तरीय स्पर्धेत Final Round मध्ये इयत्ता तिसरी मधील चि. इंद्रवर्धन शरद गोडगे या विद्यार्थ्यांने स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे

चि. इंद्रवर्धन शरद गोडगे या इ. ३ री चा विद्यार्थाने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या स्पर्धेमध्ये
इंग्रजी शब्दांचा उच्चार
इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग
इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ
या तीनही पातळीवर चुणूक दाखवत जिल्हा परिषद स्पेशल शाळा, तेर चा इंद्रवर्धन गोडगे याने हे यश मिळवले.
Congratulations to the Winners…
Final Round पर्यंत जवळपास ४,५०० विद्यार्थ्यांमधून इंद्रवर्धन गोडगे याने उत्कृष्ट सहभाग दाखवत विजेता ठरला आहे.
Word Power Championship स्पर्धेत प्रथमच उस्मानाबाद च्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांला हे यश मिळाले आहे.
या स्पर्धेत त्याला मिळालेल्या बक्षिसाचे स्वरूप:
ब्लुटूथ हेडफोन
ब्लूटूथ स्पीकर
तसेच २,५०० ची गिफ्ट कार्ड्स मिळाली. राज्यपातळीवर मळलेल्या त्याच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले