तेर – हरी खोटे :- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नेत्र तपासणी शिबिरात तेरसह परिसरातील ६०० रुग्णांची तपासणी करून ५०० गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
तेर ता. धाराशिव येथील कै. अमरसिंह पाटील यांच्या स्मरणार्थ कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय समोर मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रेवणसिद्ध लामतुरे, बाळासाहेब वाघ, शिवाजी नाईकवाडी, पद्माकर फंड, मुस्ताक काझी, डी. एम. पाटील, सरपंच दीदी काळे, प्रशांत फंड, नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे, भास्कर माळी, मतीन मोमीन, बबलू मोमीन, मज्जिद मणियार, प्रभाकर शिंपले, नवनाथ पसारे, पोपट मगर, किशोर काळे, हनुमंत कोळपे, जोशीला लोमटे, बिभीषण लोमटे, आदि उपस्थित होते.
या शिबिरात तेरसह परिसरातील ६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ५०० गरजू रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर ज्योती कानडे, ऑफथलमिक ऑफिसर श्रीकांत कल्याणी, फार्मसिस्ट दिनेश पवार, प्रदीप बनसोडे, भाग्यश्री यादव, राजश्री कोळगे, आदिंसह हॉस्पिटल स्टाफ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
More Stories
सुरेश डिसले यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान