तेर प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी तेर ता धाराशिव येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या मेळाव्याचे गट शिक्षणाधिकारी हाजी सय्यद असरार अहेमद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, केंद्रप्रमुख राजाभाऊ पडवळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी तेर व परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिकांना या बाल आनंद मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिप उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली महेबुब यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे
More Stories
५२ व्या शालेय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तनवीर तांबोळी चे यश
राज्यस्तरीय सीनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत कु. नेहा घाडगे तृतीय
श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड