तेर प्रतिनिधी :- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल मधील इयत्ता दहावीचा ९७ टक्के निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परिक्षेत तेर ता धाराशिव येथील तेरणा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.

विशेष म्हणजे शाळेचा ९७ टक्के निकाल लागला असून शाळेतून श्रेया सतीश फंड प्रथम 90.80 टक्के, द्वितीय तहूरा नियाज कबीर 77.66 टक्के, चैताली तानाजी पवार 75.20 टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यावेळी परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट बाळासाहेब वाघ, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पी. टी. देशमुख तसेच सर्व विश्वस्त मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी यांनी अभिनंदन केले.
More Stories
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
बार्शीकर धावले नांदेडमधील पूरग्रस्तांच्या मदतीला, पीडित कुटूंबियांना मदत