Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > तेरणा धरण परिसरात पूरपरिस्थिती प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची आवश्यकता

तेरणा धरण परिसरात पूरपरिस्थिती प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची आवश्यकता

मित्राला शेअर करा

तेर येथील तेरणा धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.नदीकाठच्या सर्व गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

तेर गावातील पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना तेर सरपंच नवनाथ नाईकवाडी, इरशाद मुलानी, अविनाश अगाशे तसेच गोरोबा पाडूळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर नदीकाठच्या पेठ विभागातील लोकांना साहित्यासह सुरक्षित बाहेर बाहेर काढले.

https://youtu.be/YZWtcEBZOqU

तेर मध्ये पुरपरस्थिती मुळे ग्रामिण रुग्णालय येथे अडकलेले रुग्ण व रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांना सुखरुप पणे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले.यावेळी रुग्ण कल्यान समिती सदस्य बबलु भैय्या मोमीन, ग्रा.पं.सदस्य ईरशाद मुलानी, हरी खोटे,साजिद सय्यद,आरशाद मुलानी,रिजवान मोमिन आदी लोकांनी महत्वाची भुमिका बजावली.

या अतिवृष्टीमुळे शेती व व्यापारी तसेच नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, प्रशासनाने तत्परता दाखवून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे असा संतप्त सूर नागरिकांतून येत आहे.

डॉ.पद्मसिंह पाटील यांनी येथील पूरस्थितीची पहाणी केली व ग्रामस्थांना दिलासा दिला.