सांघिक प्रकारात पटकावला प्रथम क्रमांक ; पद्माकर कात्रे झाले ‘रेस अक्रॉस अमेरिका’ स्पर्धेसाठी पात्र
बार्शी : पुणे ते गोवादरम्यान “द डेक्कन क्लीफ हँगर सीझन २०२२’’ या सायकल स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी सर्वोत्तम कामगिरी करत बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. सांघिक प्रकारात चंद्रकांत बारबोले, अजित मिरगणे व सूरज मुंढे यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी २४ तासांत ६४३ किमी अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. तर वैयक्तिक प्रकारात पद्माकर कात्रे यांनी केवळ २७ तास १३ मिनिटात ६४३ किलोमीटर अंतर पार केले.
रेस अक्रॉस अमेरिका या अमेरिकेत होणाऱ्या ४८०० किमीच्या स्पर्धेत निवड होण्यासाठी सायकलपटूंना ६४३ किमी अंतर विनाथांबा ३२ तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे कात्रे हे आता अमेरिकेत होणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका या ४८०० किमीच्या स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
“द डेक्कन क्लिफ हँगर”ची ही नववी सायकलिंग स्पर्धा शनिवारी (दि. २६) सकाळी सहा वाजता पुणे येथील केशवबाग, डी. पी. रोड येथून सुरू झाली. स्पर्धेतील पुणे ते गोवा हे ६४३ किमी अंतरात महाबळेश्वरच्या उंच पर्वतरांगा, अंबोली घाट असे अनेक घाट ओलांडून ३२ तासांत पूर्ण करण्याचे शारीरिक व मानसिक परीक्षा पाहणारे आव्हान स्पर्धकांसमोर असते.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप