Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > शासन आपल्या दारी उपक्रमांअंतर्गत सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम अदा करणेबाबत बार्शी तालुक्यातील शिबिरास उपजिल्हाधिकारीअभिजीत पाटील उपस्थित राहणार

शासन आपल्या दारी उपक्रमांअंतर्गत सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम अदा करणेबाबत बार्शी तालुक्यातील शिबिरास उपजिल्हाधिकारीअभिजीत पाटील उपस्थित राहणार

शासन आपल्या दारी उपक्रमांअंतर्गत सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम अदा करणेबाबत बार्शी तालुक्यातील शिबिरास उपजिल्हाधिकारीअभिजीत पाटील उपस्थित राहणार
मित्राला शेअर करा

शासन आपल्या दारी उपक्रमांअंतर्गत सुरत-चेन्नई महामार्गा अंतर्गत मौजे दडशिंगे ता. बार्शी या गावातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची नुकसान भरपाई रक्कम अदा करणेबाबत मौजे दडशिंगे या गावी सकाळी 11.00 वाजले पासून शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिरास उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
अभिजीत पाटील उपस्थित राहणार आहेत.

केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत-चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरु असून सोलापूर जिल्हयाअंतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यामधून हा महामार्ग जात आहे.

बार्शी तालुक्यातील 16 गावांमधून 9 गावांना नुकसान भरपाई नोटीस पारित केल्या आहेत. त्यातील मौजे दडशिंगे ता. बार्शी या गावातील एकूण 36 गट धारकांना नोटीस देण्यात आल्या असून त्यातील फक्त 2 गट धारकांनी नुकसान भरपाई मिळणेकामी प्रस्ताव सादर केले आहेत. उर्वरित गटधारकांना प्रस्ताव सादर करुन त्यांची त्वरीत तपासणी करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करणेकामी पुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी गांव पातळीवर नुकसान भरपाई रकमेचे प्रस्ताव दाखल करुन घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करुन देणे, संबंधित आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणेकामी दि. 18/07/2023 रोजी मौजे दडशिंगे या गावी सकाळी 11.00 वाजले पासून शिबीर आयोजित करणेत आले आहे. तरी शिबीराची गाव पातळीवर व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. गावी दवंडी देण्यात यावे. तसेच बार्शी येथील दैनिक वर्तमानपत्रात सदर शिबीराची प्रसिध्दी देणेत यावी. सदर शिबीरासाठी खालील उपाययोजना करणेत यावे.

संबंधित गावचे तलाठी यांना सर्व दप्तारासह हजर राहणेबाबत लेखी कळविण्यात यावे.

संबंधित गावचे मंडळ अधिकारी अथवा नायब तहसिलदार यांना शिबीराचे दिवशी प्रतिज्ञालेखावर स्वाक्षरी करणेबाबत अधिकार प्रदान करावे. असे त्यांनी सांगितले आहे.

महा-ई-सेवा चालकास त्यांचेकडील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स, नेट या सर्व सोयीसह हजर राहणेबाबत सूचना द्याव्यात.

सदर शिबीराचे दिवशी स्टॅम्प विक्रेता यांना गावी हजर राहून स्टॅम्प विक्री करणेबाबत लेखी सूचना द्याव्यात.

वि. का. से. सो. बँक अधिकाऱ्यांना सदर शिबीराचे दिवशी उपस्थित राहणेबाबत लेखी कळवावे.

सध्या पावसाचे दिवस असलेने शिबीराचे जागा गांवी असलेल्या शासकीय अथवा खाजगी इमारतीमध्ये करावी.

वरीलप्रमाणे सर्व कार्यवाही पूर्ण करुन त्याबाबतचा अहवाल शिबीराचे एक दिवस आधी भूसंपादन कार्यालयास सादर करावे.

सदर शिबीराचे दिवशी उपजिल्हाधिकारी स्वतः कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह येणार असून, तहसिलदार बार्शी हजर राहून शिबीराचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडेल या दृष्टीने योग्य ते नियोजन करावे असे निर्देश उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अभिजीत पाटील यांनी दिले आहेत.